मलकापूर येथील 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर : येथील सालीपुरा भागातील १८ वर्षीय तरुणाचा पूर्णेच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना जळगाव खान्देशातील कोथळी येथील मुक्ताबाई मंदिरानजीक १० मार्च रोजी सायंकाळी घडली. ११ मार्च रोजी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळला.मलकापूर येथील सालीपुरा भागातील रहिवासी गोकुळ दारासिंग राजपूत (वय १८ वर्षे) इयत्ता १२ वी चा विद्यार्थी होता. १० मार्च रोजी गोकूळ राजपूत सहकारी मित्रांसोबत देवदर्शनासाठी गेला होता. सायंकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील मुक्ताबाईच्या दर्शनानंतर तो पूर्णा नदीवर पोहोचला. सायंकाळी ६वाजताच्या सुमारास गोकुळ दारासिंग राजपूत हा हिरवळीवरून पाय घसरून पूर्णेच्या पात्रात पडला. त्यामुळे नदीच्या काठावर उभे असलेल्या लोकांनी व सहकारी तरुणांनी आरडाओरडा केली. पण तोवर गोकुळ पाण्यात बुडाला. या घटनेत काहींनी गोताखोरांना पाचारण केले. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी माजी नगराध्यक्ष अँड हरीश रावळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *