दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या जामोद येथील २३ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा दुरदैवी मृत्यू

दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या जामोद येथील २३ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा दुरदैवी मृत्यू दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या जामोद येथील २३ वर्षीय युवकाचा मुंबई येथील जेजे हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान दुरदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता च्या दरम्यान घडली जामोद येथील पियुष सुरेश वानखडे वय २३ वर्षे हा युवक दि १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वा च्या दरम्यान नांदुरा येथून जळगाव जामोद कडे दुचाकीने येत असतांना येरळी गावांजवळ दुचाकीचा अपघात होवुन या अपघातात पियुष याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्यास उपचारार्थ खामगांव येथील सिल्हरसीटी या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते तब्बल ९ दिवस उपचार करून तब्बेतीत सुधारणा न झाल्याने दि २२ फेब्रुवारी रोजी त्यास मुंबई येथील जेजे हॉस्पिटल येथे उपचार्थ भरती करण्यात आले होते परंतू त्याचा आज दि २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता दरम्यान दुरदैवी मृत्यू झाला सदर युवक हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता वरील घटनेमुळे जामोदसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत्याच्या पश्चात आई वडील, एक बहीन जावाई, असा आप्त परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *