संविधान बदलण्याची भाषा करणारे खासदार वर कार्यवाही करावी कॉंग्रेस चे निवेदन

संविधान बदलण्याची भाषा करणारे खासदार वर कार्यवाही करावी कॉंग्रेस चे निवेदन जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी:-जळगाव जामोद तालुका काँग्रेस ने तहसीलदार मार्फत राष्ट्रपतीनां निवेदन देऊन निषेध नोंदवला. भा.ज.प.चे राज्यसभा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्याचे संदर्भात केलेले देशद्रोही वक्तव्या बाबत. अनंतकुमार केंद्रातील भा.ज.प.चे मोदी सरकारकडून पदोपदी संविधानची पायमल्ली व लोकशाहीची गळचेपी करण्यात येत असतांना भरीस भर म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते आनंदकुमार हेगडे यांनी रविवारी हवेरी जिल्हयातील सिध्दपुरा येथे एक जाहिर सभेत बोलतांना संविधान बदलण्या संदर्भात वादग्रस्त विधान केले. भा.ज.प.ने लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर भारतीय संविधानचे पुर्ण लेखन केले जाईल असे त्यांनी विधान केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी निर्माण केलेल्या पवित्र संविधानाला बदलण्याची भाषा वापरून संविधान संपुष्टात आणण्याचा भा.ज.प.ने अनेक वेळा मनसुबा व्यक्त केला आहे. हेगडे हयांनी केलेल्या विधानामुळे संविधानप्रिय देशवाशीयांच्या भावना दुखावल्या असून देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो हे भा.ज. चे षडयंत्र असुन राज्यघटने बाबत हेगडे यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरत आहे. परिणामी हेगडेच्या या वादग्रस्त विधानामुळे देशात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाच्या आणि गरिबांच्या विकासासाठी भा.ज.प.ला बहुमताची गरज नाही तर राज्य घटना बदलण्यासाठी बहुमताची गरज असल्याचे भा.ज.चे.हेडगे हयांनी केलेल्या विधानातुन स्पष्ट होत आहे.मनुस्मृती नुसार राज्य घटना असावी हा भा.ज.प.चा कुटील डाव आहे. जर राज्य घटना बदलली तर देशांत दंगली असतील सामाजीक टिका निर्माण होवुन हिंसाचार वाढेल व रक्तपात होईल देशातील अराजकता पसरण्याची शक्यता हेगडे ह्यांच्या माध्यमातुन हा विचार व्यक्त करित असुन राज्य घटने बाबत अतिशय अवमानकारक दर्जाहीन वक्तव्य करणारे हेगडे हयांना तात्काळ जा ज्यसभेतून निलंबीत करण्यात यावे व त्यांच्यावर देशद्रोहीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशा.तहसिल कार्यालय प्रकारचे निवेदनात केले आहेसदर निवेदनावर अच्छेखा हबीबखा, स्वातीताई वाकेकर, अविनाश उमरकर, अर्जुन घोलप,अझर देशमुख, विनोद धंदर,सत्यविजय सातव व अजय राजपूत, जहीर सह अनेक कांग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *