महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाची एस.टी.महामंडळाने घेतली दखल

तालुकाध्यक्ष भागवत उगले

नांदुरा प्रतिनिधी

अखेर बस सेवा सुरु…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाची एस.टी.महामंडळाने घेतली दखल.गेल्या अनेक दिवसाँपासुन निमगाँव बस स्थानक परिसरातील रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे.सुरक्षात्मक कारणाने जळगांव जामोद आगाराने निमगांव,दादगांव,नारखेड,ईसापुर ह्या बसफेर्‍या नाईलाजाने बंद केल्या होत्या त्यामुक्षे मुख्य चार गावांसह पंचक्रोशीतील विद्यार्थी व नागरीक यांना त्रास सहन करावा लागत होता,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते या बाबीला कंटाळुन नागरिक व विद्यार्थी यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रारी येत होत्या याची दखल घेत म.न.से.नांदुरा तालुक्का अध्यक्ष भागवत ऊगले नांदुरा शहरअध्यक्ष सागर जगदाळे अनंत बोचरे अनंता सुषिर शाखाप्रमुख नयन राठोड अमोल करुटले मनसे मिडिया यांचेसह पदाधिकारी यांनी जळगांव जामोद आगार प्रमुखांना बस सेवा सुरु करण्याबाबत निवेदन देऊन बसेस सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता त्याची दखल घेत जळगांव जामोद आगारप्रमुखांनी दि.१८जानेवारी २०२४पासुन नियमित बसेस सुरु केल्या आहेत.याबाबत नागरीक व विद्यार्थी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिनंदन व स्वागत केले आहे.जनतेच्या सर्व हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्देव तत्पर असल्याचे वक्तव्य तालुका अध्यक्ष भागवत ऊगले यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *