या कलियुगा मध्ये गरज नामांचीच,नाम हेच परमात्मा स्वरूप ह.भ.प.विपुल महाराज भांडे

या कलियुगा मध्ये गरज नामांचीच,नाम हेच परमात्मा स्वरूप ह.भ.प.विपुल महाराज भांडे यांचे प्रतिपादन,बोराळा येथे श्री.संत जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा

प्रतिनिधी दर्यापूर

बोराळा येथे श्री.संत जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा बोराळा गावच झाले प्रती पंढरपूर टाळ विना मृदंगाच्या गजरात दुमदुमली बोराळा नगरी या कलियुगामध्ये गरज नामाचीच अर्थात कलियुगि उध्दार हरीच्या नामे नाम” हेच परमात्मस्वरूप आहे.ह भ प विपुल महाराज भांडे यांचे प्रतिपादन. बोराळा येथे श्री संत झाबुजी महाराज यांच्या जन्मोत्सव अर्थात बारसे निमित्त. दि ५ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत जगतगुरू संत तुकाराम महाराज गाथायाचे पारायण व्यासपीठ नेतृत्व ह भ प विपुल महाराज भांडे यांच्या सुमधुर अमृततुल्य वाणीतून संपन्न होत जगतगुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा तथा नामसंकीर्तन सप्ताह महोत्सव सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा *संत झाबुजी महाराज यांचे भक्त संत ह भ प श्री दिगंबर बकारामजी कळसकर महाराज. यांचे राहते घरी झाबुजी महाराजांचा उत्सव आनंदात साजरा करतात त्यामध्ये सर्व युवा तरुण उत्साही मंडळ आणि सर्व गावकरी मंडळी जय गुरु भजन मंडळ तसेच श्री संत गाडगेबाबा सांप्रदायिक महिला भजन मंडळ सर्व भक्त मंडळ तन मन धनाने सेवा सहकार्य करतात सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा आनंदात होतो कार्यक्रमाची रूपरेषा असते अशी रोजी दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५:६ काकडा सामुहिक गाथा पारायण ९: ११ दुपारी ३;५ हरिपाठ ६. : ७. ८:३०:१०:३० हरीकिर्तन आणि काल्याचे समारोह दिवशी गावामधुन भव्य प्रदक्षिणा करण्यात आले यामध्ये गावातिल सर्व आप आपला परीसरामध्ये घरा समोर रांग रांगोळी सळा वगैरे काढून भव्य दिव्य असा छान प्रकारे सुशोभित केले होते “नाम” म्हणजे भगवंताचे नांव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळया नांवांत फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. वृत्तिचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तिसुध्दा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल, वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळयांचा भावार्थ एकच आहे.अन्नाला स्वत:ची चव असते त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वत:ची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वत:ला विसरून जावे हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे.* असहि ह भ प विपुल महाराज भांडे सांगत होते तयानंत ते सांगत होते जसे आपले आपलेपण आपल्या नांवात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुध्दी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे. आपल्या जीवनाचे जर सार्थक करून घ्यायचे असेल तर नाम नक्कीच घ्या लागते नामाला घेऊनच समोर जावे लागते आणि धार्मिक कार्य मधूनच हा मार्ग निश्चितपणे आपल्याला सामोरे घेउन जातो त्यामुळे कलियुगात युवा तरुण वर्गाला या मधुन आचार विचार संस्कृती परंपरा संस्कार यांची फार आवश्यकता आहे यामध्ये युवा पिढी बाल तरुण वर्ग असो आणि ईतर सर्वत्र सर्वांना या कलियुगामध्ये आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळाला याची फार अंत्यंत आवश्यकता आणि गरज आहे या कलियुगात नामाविना नामासारखे ईतर दुसरे काहीही नाही. असंही ते कथे मधून सांगत होते *ह भ प विपुल महाराज भांडे मो संपर्क ७०५७३१२४३४. विनित तथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संत महाराज श्री ह भ प दिगंबर बकारामजी कळसकर* *मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले युवा तरुण उत्साही मंडळ आणि समस्त गावकरी मंडळ जय गुरु भजन मंडळ तसेच श्री संत गाडगेबाबा सांप्रदायिक महिला भजन मंडळ आणि आयोजक श्री ह भ प अनिल भाऊ डिके आणि बाबांचे सेवेकरी ह भ प गणेश भाऊ टाले यांनी तर सर्वांचे आभार प्रदर्शन केले श्री परमहंस झाबुजी महाराजांच्या आशीर्वादाने हा जन्मोत्सवाचा तथा बारश्याचा सोहळा आनंददायी संपन्न झाला बोराळ ता दर्यापूर जिल्हा अमरावती विदर्भ महासंत नगरी महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *