जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये निष्काम कर्मयोगी करतोय आरोग्यसेवा

प्रतिनिधी जळगाव जामोद

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तथा संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावे आजच्या आधुनिक युगातही सुविधांपासून दुर्लक्षित आहेत . अशातच श्री सत्यसाई मेडिकल प्रोजेक्ट महाराष्ट्र जिल्हा बुलढाणा अंतर्गत श्री सत्यसाई सेवा संघटना बुलढाणा जिल्ह्याचे सेवादल प्रमुख सर श्री कैलासजी कोल्हे सर यांचे माध्यमातून अगदी दुर्गम आदिवासी पाड्यांवर आरोग्य सेवा पोहोचत आहे .सदर संघटनेमार्फत तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रुग्ण तपासणी करून जवळपास 60 प्रकारची औषधे रुग्णांना मोफत वाटप केली जातात . या कामी त्यांना समाधान हॉस्पिटल जळगाव जामोद चे संचालक डॉ अविनाश पाटील ,सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ श्री सतीश नेवे , फार्मसिस्ट श्री उगले , सेवानिवृत्त फार्मसीस्ट श्री गजानन उज्जैनकर यांची मोठी मदत होत आहे .ऊन , थंडी ,पाऊस या कशाची पर्वा न करता श्री कोल्हे सर तथा त्यांचे सहकारी श्री गजानन दाते ,श्री पुरुषोत्तम गव्हाणे भल्या पहाटे डोंगराळ दुर्गम आदिवासी भागात औषध साठा घेऊन संघटनेचे ॲम्बुलन्स ने हजर होतात . अगदी मैलगडाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यापासून रायपूर ,नांगरटी , गारपेठ , निमखेडी , चारबन , डुक्करदरी , गोडाडा धरण , भिंगारा ,चालीस टापरी , वनवासी एकलव्य आश्रम जामोद , मालठाणा , निहालवाडी ,कुंवरदेव , शिवाजीनगर , सोनबर्डी , वडपाणी , दयालनगर ,शिवणी हड्यामल इत्यादी गावातील हजारो दुर्लक्षित रुग्णांपर्यंत पोहोचले आहेत . सदर गावातील रुग्णसेवे संबंधीत सर्व माहिती ही राज्यस्तरावर फोटोसह वेळोवेळी दररोज ऑनलाइन पद्धतीने सादर केली जाते .प्रत्येक

महिन्याचे नियोजन हे वारानुसार महिन्याच्या सुरुवातीलाच केले जाते व नियोजनबद्ध पद्धतीने , दुपारनंतर आदिवासी बंधू शेतात निघून जातात त्यामुळे पूर्ण टीम भल्या पहाटेच गावात दाखल होते . सदर टीमच्या वतीने दर दिवाळीला याच परिसरातील एखाद्या गावात साडी चोळी तथा फराळ वाटप केले जाते .विशेष बाब म्हणजे याबद्दल श्री कैलासजी कोल्हे तथा त्यांच्या टीमचा राज्यातून प्रथम क्रमांक आला आहे . जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निमखेडीचे मुख्याध्यापक श्री उमेश खारोडे यांनी या भागातील वैद्यकीय गरजेची माहिती श्री कोल्हे सर यांना देऊन आरोग्य कॅम्पच्या नियोजनात मोठी भूमिका पार पाडली आहे .तसेच सदर टीमला सुट्टीच्या दिवशी तथा आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची धडपड खारोडे सर करताना दिसत आहेत त्याबद्दल त्यांचे परिसरातील आदिवासी बांधवांच्या वतीने कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *