
शेलोडीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचनाची भीमगीतांच्या सुरेल मैफलीने सांगता
नांदुरा तालुका प्रतिनिधी (संदेश पहुरकर)
दि. २७ ऑक्टोबर २०२६ : भगवान गौतम बुद्ध यांच्या मानवतावादी विचारांचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा जागर घडविणाऱ्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या वाचन व प्रबोधनपर उपक्रमाची सांगता आज महाराष्ट्रातील नामवंत गायक महेंद्र सावंग यांच्या दमदार भीमगीतांच्या कार्यक्रमाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.शेलोडी येथे आयोजित या उपक्रमादरम्यान ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील विचारांचे वाचन, चिंतन आणि प्रबोधन करण्यात आले. बुद्धांचा धम्म, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतावादी मूल्यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.सांगता समारंभाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या महेंद्र सावंग यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रभावी आवाजातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर घडविला. त्यांच्या प्रत्येक गीताला उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळत होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रबोधनासोबतच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या उपक्रमाला शेलोडी व परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने सहभागी सर्व मान्यवर, कलाकार, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.महापुरुषांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश पुढे नेण्यासाठी अशा प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
