
सेंट पॉल्सच्या मुलींची विभागीय स्पर्धेसाठी निवड!
देवानंद खिरकरअकोला जिल्हा प्रतिनिधी
जिल्हास्तरीय डीएसओ शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथील १९ वर्षांखालील मुलींच्या बेसबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात मानाची भर पडली आहे.दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, हिंगणा-म्हैसपूर, गीतानगर, अकोला येथे जिल्हास्तरीय डीएसओ शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमीच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.संघातील खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, शिस्त आणि सांघिक भावनेच्या जोरावर हे यश संपादन केले.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी विभागीय स्पर्धेतही संघ उत्तम कामगिरी करून शाळेचा नावलौकिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष नवनीतजी लखोटिया, उपाध्यक्ष लूनकरणजी डागा, सचिव प्रमोद चांडक, शारदा लखोटिया, रेखा चांडक, सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक विजयजी बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, प्रभुदासजी नाथे, पर्यवेक्षक नितीन गावंडे, मालती महल्ले, सुचिता गायकवाड, वैशाली गावत्रे तसेच शिक्षकवृंदाने यशस्वी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.या यशस्वी कामगिरीसाठी क्रीडा शिक्षक अभिलाष काळमेघ, प्रणव देंडव, नारायण वानखडे, संगीता सुरळकर, सुजल काळबोंडे आणि स्नेहा टोबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना आपली क्रीडा कौशल्ये विकसित करण्याची आणि यशाची नवी शिखरे गाठण्याची प्रेरणा मिळाली.सेंट पॉल्स अकॅडमीच्या १९ वर्षांखालील मुलींच्या बेसबॉल संघाच्या या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, विभागीय स्तरावरील आगामी स्पर्धेसाठी संघाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
