बोर्डी गौण खनिज दंड प्रकरणाची फेरचौकशी रखडली,अर्जदाराची न्यायाची मागणी

बोर्डी गौण खनिज दंड प्रकरणाची फेरचौकशी रखडली,अर्जदाराची न्यायाची मागणी

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी गौण खनिज दंड प्रकरणात महसूलमंत्री मुंबई यांनी फेरचौकशीचे आदेश देऊनही गेल्या अकरा महिन्यांपासून फेर चौकशीच सुरू न झाल्याचा गंभीर आरोप अर्जदार देवानंद रमेश खिरकर यांनी केला आहे.याप्रकरणी त्यांनी उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय अकोट यांच्याकडे १६ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखी तक्रार अर्ज दाखल करून दोषींवर फेरचौकशी करून कडक कारवाईची मागणी केली आहे.अर्जदाराच्या तक्रारीनुसार,ग्रामपंचायत बोर्डीच्या विकास कामांबाबत केलेल्या तक्रारीच्या चौकशीनंतर गैरअर्जदारांवर गौण खनिज प्रकरणात सुमारे ३५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.या आदेशाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी अकोला व अप्पर आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील करण्यात आले होते.मात्र तेथे दंड कायम राहिला.पुढे सक्तीची वसुलीची व मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू असताना त्यातीलच गैरअर्जदार एक ते पाच पैकी एकाने २,२९,९४४ रुपये दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात भरल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यानंतर पुन्हा महसूलमंत्री मुंबई यांच्याकडे अपील करण्यात आले.महसूलमंत्री मुंबई यांनी प्रकरणाची फेरचौकशी करून एका महिन्याच्या आत प्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश दिल्याचे अर्जात म्हटले आहे.मात्र दहा ते अकरा महिने उलटूनही फेरचौकशी सुरू न झाल्याने प्रकरण प्रलंबित असून संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महसूलमंत्री मुंबई यांच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून गैरअर्जदारांना नोटीस बजावावी व फेरचौकशी सुरू करावी आणि आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी देवानंद रमेश खिरकर यांनी केली आहे.अर्जाच्या प्रती महसूलमंत्री मुंबई,अप्पर आयुक्त,अमरावती आणि जिल्हाधिकारी अकोला यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.*प्रतिक्रिया*ग्राम पंचायत बोर्डी गौण खनिज दंड प्रकरणात महसूलमंत्री मुंबई यांनी दि.१७/१२/२०२५ रोजी फेरचौकशीचे आदेश दिले.तरी उपविभागीय अधिकारी अकोट यांनी अद्यापही फेर चौकशी सुरू केली नाही व प्रकरण पेंटिंग ठेवले आहे.तरी फेर चौकशी सुरू करून आदेश करावा व मला न्याय द्यावा देवानंद खिरकर तक्रारदार बोर्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *