श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न …..

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

प्रतिनिधी जळगाव जामोद 3 जानेवारी 2024 रोजी श्री.कृ. कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ.प्रविण डाबरे व प्रा.जी.एस.वानखेडे (पर्यवेक्षक) यांचे मार्गदर्शनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न झाली, यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वसंत चव्हाण ,प्रमुख वक्ते मिलिंद जोशी सहसचिव जळगाव शिक्षण मंडळ जळगाव जामोद ,संजय गाडेकर (अधीक्षक) ,प्रा. राजीव देवकर सांस्कृतिक विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती ,सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. राजीव देवकर सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी केले. तसेच कु.पुनम मानकर, कु.सुप्रिया वानखडे या विद्यार्थिनींची भाषणे व कु.रंजना सातपुते या विद्यार्थिनीने गीत सादर केले.यानंतर संजय गाडेकर (अधिक्षक )यांनी सावित्रीबाईं फुलेंच्या जीवनावर प्रकाश टाकला. मिलिंद जोशी सहसचिव ज.शि.मं जळगांव जामोद यांनी विपरीत परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे मुलींसाठी खुली केली असे प्रतिपादन केले . अध्यक्षीय भाषण प्रा. वसंत चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा.आकाश निलजे आणि आभार प्रदर्शन प्रा.राजीव देवकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ऋषिकेश कांडलकर ,प्रा. विनोद झोपे, प्रा. गणेश जोशी, प्रा विनोद बावस्कर, प्रा. रामेश्वर सायखेडे, प्रा. भोपळे मॅडम, प्रा.रामेश्वर फाळके,प्रा. जाणे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी बंधू , व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *