२५ डिसेंबर स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यासाठी नियोजन बैठक संपन्न

प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगांव जामोद:-दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक पक्ष कार्यालयात महिला आघाडीच्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यासाठी व त्या कार्यक्रमाचे नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग ह्या होत्या सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर प्रमुख पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले यामध्ये जिल्हा अध्यक्षा विशाखाताई सावंग, जिल्हा उपाध्यक्ष प्रितीताई शेगोकार, जिल्हा उपाध्यक्षा पार्वतीबाई इंगळे, जिल्हा उपाध्यक्षा सुमनताई थाटे यांनी २५ डिसेंबर रोजी आयोजित स्त्रीमुक्ती दिनाच्या आयोजना निमित्त मार्गदर्शन केले व स्त्री मुक्ती दिन हा कार्यक्रम भव्यदिव्य असा साजरा करण्यासाठी सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका/ शहर पदाधिकारी यांनी प्रयत्न करावे असे जिल्हा अध्यक्षा विशाखाताई सावंग यांनी आपल्या भाषणातुन सांगितले यावेळी जिल्हा पदाधिकारी कुसुमताई इंगळे, मंगलाताई पारवे,तालुका अध्यक्षा सुनिताताई हेलोडे, मलकापूर तालुका अध्यक्षा संगीताताई सावळे, ताराबाई तायडे, अर्चनाताई लुलेकर, रमाबाई तायडे, रुपालीताई तायडे, संगीताताई ससाने,अनिता सावळे, सुनिलभाऊ बोदडे,आजम कुरेशी, संतोष पवार, अमोल तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पदाधिकारी मंगलाताई पारवे तर प्रास्ताविक पार्वताबाई इंगळे यांनी व आभार सुनिताताई हेलोडे यांनी केले या कार्यक्रमात अनेक महिलांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *