
पाणी समस्या सोडविण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक – नगरसेवक शिवराज जाधव
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : अल निनोमुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी जपून वापरणे सर्वांचेच कर्तव्य आहे. यावर उपाययोजना म्हणून नगर परिषद प्रशासन आगामी काळात देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा वेळेत १५ मिनिटांची कपात करणार असली तरी या संकटाशी दोन हात करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने योग्य नियोजन, पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणे, लिकेजेसद्वारे हजारो लिटर वाया जात असलेले पाणी तात्काळ थांबविणे, यासारख्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन नगरसेवक शिवराज जाधव यांनी मलकापूर नगर परिषदेच्या वतीने २२ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण सभे प्रसंगी केले.यावर युवा नगरसेवक शिवराज जाधव यांनी न.प. प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत आपण या संकटाशी सामना करण्यासाठी सर्वांनी सोबत असले पाहिजे असे सांगत केवळ १५ मिनिटे वेळ कमी करून हा पाणी प्रश्न सुटणार नसून शहरातील अनेक भागातील नागरीक आजही केवळ न.प.च्या पाणी पुरवठ्यावरच पुर्णतः अवलंबून आहेत. यामुळे धुपेश्वर येथील पाण्याच्या परिस्थितीचा विचार करून उन्हाळ्यात तेथील विविध झऱ्यांमध्ये खोलीकरण करून पाण्याचे स्त्रोत निर्माण करणे, नदीत सुरू असलेल्या मोटारीद्वारे होत असलेला अवैध उपसा थांबविणे, शहरात नियमित लिकेजेसद्वारे वाया जात असलेले हजारो लिटर पाणी वाया जावू नये यासाठी तात्काळ लिकेजेस दुरुस्तीसाठी यंत्रणा उभी करणे, शहरात बंद अवस्थेत असलेल्या हापशांना दुरूस्त करून त्या सुरू करणे, नळगंगा धरणावरून राखीव पाण्यासाठी आता पासूनच उपाययोजना करणे, न.प. अधिकाऱ्यांसह त्या त्या भागातील नगरसेवक, लोक प्रतिनिधी यांच्याद्वारे पाणी बचतीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, अशा विविध उपाययोजना न.प. प्रशासनाने राबवाव्या असे आवाहन केले.
