दहीहंड्यात १३५ किलो गोमांस जप्त,दोघांना अटक

दहीहंड्यात १३५ किलो गोमांस जप्त,दोघांना अटकदोन दुचाकींसह १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत,पहाटे पोलिसांची कारवाई

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

दहीहंडा पोलिसांनी गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई करत १३५ किलो गोवंश मांसासह दोन दुचाकी जप्त केल्या.१६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण १ लाख ५३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.पोलीस जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अवैध गोवंश तस्करीविरोधी मोहिमेअंतर्गत दहीहंडा टाऊन परिसरात पोलिसांचे गस्ती पथक कार्यरत होते.यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली. पहिल्या कारवाईत अब्दुल नाशिर अब्दुल रशीद(वय ५३, रा. दहीहंडा) याच्याकडून ७० किलो गोमांस आणि होंडा शाईन दुचाकीअसा ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत अस्लम अहमद शेख मुसा (वय ३८, रा. दहीहंडा) याच्याकडून ६५ किलो गोमांस आणि हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी असा ७६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ मधील कलम ५, ५(ब), ९३९ (अ) अन्वये दहीहंडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश मांस वाहतुकीविरोधात कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *