
कोरपणा नगरपंचायतीचा भोंगड कारभार =सफाई कामगारांना चार महिन्यापासून पगार नाही
ता प्र ) प्रतिनिधी
सफाई कामगाराच्या काम बंदआंदोलन मुळे घनकचरा व्यवस्थापन व कंत्राटधाराच्या मनमानी कारभार उघड पडल्याने अनुसूचित जाती जमातीच्या सफाई कामगारांचे किमान वेतन कायद्याअंतर्गत पगारांमध्ये तफावत गेल्या सात वर्षात अटी व शर्ती उल्लंघन करून कंत्राटदार भूषण इटनकर यांनी पीएफ रक्कम भविष्य निर्वाह निधी जमाच केली नाही पगारासह अनियमित्ता मंजूर पगार त्यांच्या हाती न देता परस्पर रक्कम उचल करून बँकेतून रकमेचा घोळ व फसवणूक केल्याची जाण झाल्यानंतर दोन ऑक्टोबरला धरणे आंदोलनाचे शस्त्र उभारून कामगार काम बंद आंदोलन छेडले होते याची दखल घेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे व मुख्याधिकारी राम रावते यांनी मंडपाला भेट देऊन चार महिन्याचेथकीत पगार मागील पगारातील तफावताची रक्कम तसेच पीएफ रकमेबाबत लेखी पत्र दिले पंधरा दिवसाचा कालावधी लोकं सुद्धा ऐन दसरा दिवाळी सन तोंडावर असताना या ग्रामसफाई कामगारांच्या कुटुंबाला पगार न मिळाल्यामुळे कुटुंबामध्ये सणाचा उत्सव साजरा होणार की आपल्या नशिबाला दोष देणार अशी चिंता कामगारांमध्ये आहे मुख्याधिकारी ठाम लेखी आश्वासन देऊन सुद्धा ठेकेदाराला पत्र व्यवहार करून सुद्धा कंत्राटदाराने पीएफ व पगार देण्याकडे दुर्लक्ष केले आहे यामुळे ठेकेदार आमची फसवणूक केले असताना दोषी कंत्रटदारावर विरुद्ध कारवाई का होत नाही यामागे कोणाचा आशीर्वाद आहे याबाबतची सखोल तक्रार पोलीस प्रशासन पीएफ कार्यालय मुख्याधिकारी यांना दिली आहे गावातील नागरिकांना काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र घनकचरा व्यवस्थापन या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याने नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे
