नवदुर्गा उत्सव मंडळात महिलांचा भक्तिमय भजन कार्यक्रम

नवदुर्गा उत्सव मंडळात महिलांचा भक्तिमय भजन कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव):

शहरातील माधव नगर, लाखाळा परिसरातील मुर्डेश्वर कॉलनी येथील नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सलग नऊ दिवस विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भजन, हरिपाठ व भक्तिमय कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात परिसरातील विविध महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी इंदुबाई उंडाळ, कासाबाई उंडाळ, लक्ष्मीबाई शिरसाट यांच्यासह परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने भजन व हरिपाठ, भक्तीमय गित गायन करून वातावरण भक्तिमय केले. तसेच विविध भक्तिगीते सामूहिकरीत्या गाऊन देवीची आराधना केली.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सलग नऊ दिवस महिलांनी एकत्र येत धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भजन, हरिपाठ आणि भक्तिसंगीताच्या माध्यमातून महिलांनी धार्मिक परंपरा जपत एकात्मतेचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे महिलांना एकत्र येऊन अध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. नवरात्रोत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय कार्यक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *