छातीवर दगड ठेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या शंभु सेना सामाजिक संघटनेचे अभिनव आंदोलन

छातीवर दगड ठेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या शंभु सेना सामाजिक संघटनेचे अभिनव आंदोलन

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोला जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अपुरे व अनियमित राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे छातीवर दगड ठेवून अभिनव आंदोलन करण्यात आले.शेतकरी आपल्या काळजावर दगड ठेवून अस्मानी व सुलतानी संकटांचे वार झेलत आहे, हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, फळबागा व इतर पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, असे संघटनेने नमूद केले.*शंभु सेना सामाजिक संघटनेच्या प्रमुख मागण्या*१) अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त व पावसाअभावी नुकसान झालेल्या गावांचे तातडीने सर्वेक्षण करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा.२) पिकांचे तातडीने पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.३) पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याची नुकसानभरपाई मिळवून द्यावी.४) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती कर्जाबाबत कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत व इतर आवश्यक उपाययोजना कराव्यात.५) जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करावी.६) शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणे, खते व आवश्यक कृषी निविष्ठांसाठी शासनाकडून आर्थिक मदत द्यावी.७) दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती व मदतीचा लाभ तातडीने मिळवून द्यावा.८) कोणताही पात्र शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा उभारावी.९) ज्या शेतकरी बांधवांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांना पिके वाचवण्यासाठी सलग २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा.१०)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणुन ५० हजार रुपये ऐवजी २ रुपये लाख प्रोत्साहनपर अनुदान मिळावे. ११)२०१९ पूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत समाविष्ट करावे.“शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. मात्र आज तो अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात सापडला आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन मदत जाहीर करावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला.यावेळी शंभु सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अश्विन उद्धवराव नवले,सुभाष साबे,बार्शी टाकळी तालुका प्रमुख सचिन आगाशे,प्रमोद पाचपोर,राजेश दांडेकर,गणेश गोगे,सुभाष साबे,सचिन चांभारे,अतुल ठाकरे,बाळुभाऊ कसुरकार,मधुकर सोनारगण,दीपक कळसाईत,गणेश खरात,मकरंद पाटोळे,सचिन सोनटक्के,शामकुमार वाघेले,राजेश शिंदे,योगेश वाव्हाळ,गोपाल सरोदे,अतुल बोके,आकाश मस्तूद,नितीन मंगलवार, गजानन नागलकर,गजानन पाटील,आकाश गवळी,अश्विन नवघरे,कैलास खरात,अजय पाटील,नीलेश भोसले,विकी जगताप,संदेश काजळकर,किशोर गाडगे,नागेश इंगोले,शुभम राजुरकर, अस्मित तेलगोटे,प्रेम वाकोळे,रोहन पांडे,यश पाखरे,अजय दाभाळे,प्रिन्स पाटील,अनिल ठाकरे,रामेश्वर नानोटे,मदन काकड,सागर थोटे,भावेश नवले,निखिल गोपनारायण,पुरुषोत्तम चांभारे,शिवप्रताप मेघाडे,राजेश दुबे यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते,व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *