पणज येथे श्री महालक्ष्मी माता यात्रा महोत्सवाचे आयोजन१७ सप्टेंबरला गौरी स्थापना,१८ सप्टेंबरला मुख्य यात्रा व महाप्रसाद

पणज येथे श्री महालक्ष्मी माता यात्रा महोत्सवाचे आयोजन१७ सप्टेंबरला गौरी स्थापना,१८ सप्टेंबरला मुख्य यात्रा व महाप्रसाद

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

पणज अकोट तालुक्यातील पणज येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही १७ ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्री महालक्ष्मी माता यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती व समस्त गावकऱ्यांच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे.१७ सप्टेंबर रोजी गौरी स्थापना,१८ सप्टेंबर रोजी मुख्य यात्रा महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन,तर १९ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यात्रेदरम्यान मंदिर परिसरात पूजन,भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.बोर्डी नदीच्या काठावर वसलेले पणज येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर हे परिसरातील पुरातन व जागृत देवस्थान म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान आहे.दरवर्षी यात्रा महोत्सवानिमित्त पणजसह अकोट तालुका व परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन यंदा दर्शनासाठी सुव्यवस्था,महाप्रसाद,पिण्याचे पाणी,स्वच्छता तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.यात्रा महोत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी गावकऱ्यांकडूनही सहकार्य करण्यात येत आहे.या यात्रा महोत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री महालक्ष्मी माता मंदिर समिती व समस्त गावकरी पणज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *