
अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत,शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार,दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार केल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा.अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
