जनता व नवरंग गणेश मंडळाचे रक्तदान शिबिराला प्रतिसाद महिलांचा उत्स्फुर्त सहभाग…

जनता व नवरंग गणेश मंडळाचे रक्तदान शिबिराला प्रतिसाद; महिलांचा उत्स्फुर्त सहभाग…

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शहरातील पांडे वेटाळ व तेली वेटाळ येथील 56 वर्षांपासून – असलेला नवरंग गणेश मंडळ व जनता गणेश मंडळांनी दिनांक 15 सप्टेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला असून 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांनीही सहभाग नोंदविला आहे तसेच आरोग्य शिबीर चे आयोजन करण्यात आले औषधी चे वाटप करण्यात आले मालेगांव येथील पांडे वेटाळ व तेली वेटाळ मधील 56 वर्षे जुना असलेला नवरंग गणेश मंडळ जनता गणेश मंडळ मालेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर दिनांक 15 सप्टेंबर रोजी पार पडला असून रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यामध्ये महिलांनीही सहभाग नोंदविला रक्तदान शिबिराला जनता व नवरंग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *