श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न

श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अनंतकोटी ब्रम्हांडनायक शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भाद्रपद शुद्ध पंचमी – ऋषिपंचमीला श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे संपन्न झाला.श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट द्वारा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त एकदिवसीय नामसंकीर्तन उत्सव आयोजित करण्यात आला होता.दिनांक १४ सप्टेंबर रोजी पहाटे सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या मंदिरामध्ये अभिषेक होऊन श्री संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर यांच्या शुभहस्ते तीर्थस्थापना करण्यात आली.याप्रसंगी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विधिवत मंत्रघोष व सांप्रदायिक भजन केले. दुपारच्या सत्रामध्ये श्री.ह.भ.प. उमेश महाराज मोहोकार यांची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा व रात्रीच्या सत्रात श्री.ह.भ.प. ज्ञानेशप्रसाद महाराज पाटील यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. दिनांक १५ सप्टेंबर रोजी पहाटे काकडा आरती व श्रींचा अभिषेक संपन्न झाला.त्यानंतर श्री संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. यानंतर श्री संस्थेचे निमंत्रित सदस्य वै.सदाशिवराव पोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिपक पोटे यांचे कडून सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाकरिता श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे महादेवराव ठाकरे, पुरुषोत्तम लाजुरकर, अविनाश गावंडे, अशोकराव पाचडे, मध्यस्थी वधू वर सूचक मंडळाचे सुरेश कराळे, नागोराव कुलट, नंदकिशोर जांभुळकर वारकरी शिक्षण संस्थेचे अंबादास महाराज मानकर, राम महाराज गाढे, व्यवस्थापक अमोल मानकर, दिलीप कुलट, बाळकृष्ण वाकोडे, आदींसह संस्थेचे विद्यार्थी व भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *