लोकशाही च्या चौथा आधार स्तंभचनैस्तानाबुत करण्याचा अधिकाऱ्यांचा मनसुबा…?

लोकशाही च्या चौथा आधार स्तंभचनैस्तानाबुत करण्याचा अधिकाऱ्यांचा मनसुबा…? भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाला तीलांजली देत संपादकावर खोटे गुन्हे दाखल

अकोट तालुका प्रतिनिधी

अमरावती येथून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र अल्प कालावधीत मुसंडी मारत आज रोजी जनतेला न्याय देत नावलौकिक प्राप्त करत आहे. वृत्तपत्र हे कोणतेही असो त्यांनी नैतिकता जोपासत जनतेचा चौथा आधारस्तंभ असलेले सामान्यांच्या महत्वपूर्ण भावना ह्या समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे खरा महत्त्वाचा दुवा कार्य वृत्तपत्राच्या माध्यमातून होते. आणि वृत्तपत्रामुळेच आज घडत असणाऱ्या विविध प्रकारच्या घटना ह्या जनतेसमोर येत आहेत आज अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराने खूप मोठ्या प्रमाणात आतून पाय पसरून जाळे तयार झाले आहे आणि नेमक्या याच बाबी पत्रकार वार्ताहर व संपादक यांच्या हातीपडतात. कोणताही विषय जनसामान्यांना माहीत झाल्यास काही फरक पडत नाही परंतु पत्रकारांना हा विषय माहित पडू नये अशी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण मुखसंमतीचा रोल पार पाडला जातो. त्यामुळे पत्रकार क्षेत्रामधें भ्रष्टाचाराचा बुरखा या माध्यमातून फाडण्यात येतो.परंतु बुरख्याच्या आत अनेकांची घरे उध्वस्त होण्यारा भ्रष्टाचार व भ्रष्टाचाराला वाव देणारा आजचा अधिकारी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. आज रोजी अकोला निर्भीड निडर अभ्यासू जिल्ह्यातील एक संपादक व एका वार्ताहरांवर ओढावला आहे. आणि आज ही अवस्था त्यांच्यावर आहे. उद्या जिल्ह्यातील नव्हे तर तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील वार्ताहर पत्रकारावर ही वेळ संपादक यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटलेले अधिकारी आणू शकतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.जबाबदार अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार हप्ते वसुलया याविषयी जर पत्रकारांनी आग पाखळ केल्यास. त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांनावेटीस धरून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो,आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलचा मार्ग दाखविण्या करता पुढे सरसावतात.खरोखर अकोला जिल्ह्यामध्ये लोकशाही जिवंत आहे का? का प्रसारमाध्यम वृत्तपत्र बदनाम करणे त्यांना टार्गेट करणे हा कोणता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ टिकून ठेवणे लोकप्रतिनिधी व जनसेवेचा कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य वाटते का. अशावेळी जागरूक पत्रकारांनी व लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आज रोजी तयार होत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *