पुंडा नंदीग्राम येथे हर हर महादेव चा गजर तिसऱ्या सोमवारी हजारो भाविकांची गर्दी श्रावण मास यात्रा उत्सव

पुंडा नंदीग्राम येथे हर हर महादेव चा गजर तिसऱ्या सोमवारी हजारो भाविकांची गर्दी श्रावण मास यात्रा उत्सव निमित्त घेतला हजारो भक्तांनी महाप्रसाद नंदिकेश्वर शिवभक्त कावड मंडळाने वेधले सर्वांचे लक्ष

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील पुंडा येथे दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण मास यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गावातील श्री नंदिकेश्वर शिवभक्त मित्र मंडळ पुंडा आणि शिवभक्तांनी मिळुन कावड यात्रा उत्साहात काढून समस्त शिवभक्तांनी डीजेच्या तालावर ठेका धरून आनंद साजरा केला. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही यात्रा काढण्यात आली. यावर्षी शिवभक्तांनी पूर्णा नदी वडद इथून ५१ भरण्यामध्ये पाणी आणले. नंदिकेश्वर शिवभक्त मंडळाने ५१ भरण्याची कावड यात्रा पायी चालत पुर्ण केली.पुंडा येथुन डीजेच्या तालावर वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली.यात्रेच्या शेवटी कावड मधून आणलेल्या पाण्याने महादेवाच्या पिंडीवर कावड भक्तांनी जलाभिषेक केला.तसेच श्री नंदी महादेव संस्थान पुंडा नंदीग्राम येथे ह.भ.प.वासुदेव महाराज खोले गुरुजी राहणार वरूड जऊळका यांचे सांप्रदायिक आणि ह.भ.प.मामारी महाराज बांबर्डा यांचे परंपरा प्रमाणे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.संपूर्ण कार्यक्रमात सांप्रदायिक भजन मंडळ पुंडा व बांबर्डा येथील ढोल भजन मंडळी यांचा भक्तिसंगीताने नंदीग्रामचा परिसर न्हाऊन निघाला.श्रावण मासानिमित गावात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.गावात नंदी महादेवाचा दर्शनाकरिता हजारो भाविक आले होतें नंदी घोषने संपूर्ण गाव दुमदुमले होते. श्री नंदी महादेव संस्थानच्या वतीने भव्य स्वरूपात महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *