
केंद्रीय मानवाधिकार’ (Central Human Rights) वृत्तपत्राच्या क्राईम रिपोर्टरपदी प्रा शुभम प्रविण सावळे यांची नियुक्ती; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
मलकापूर (विशेष प्रतिनिधी):
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत अधिकृत नोंदणीकृत असलेल्या ‘केंद्रीय मानवाधिकार’ (Central Human Rights) या राष्ट्रीय हिंदी दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्र समूहाच्या क्राईम रिपोर्टर (Crime Reporter – All India) पदी मलकापूर (जि. बुलढाणा) येथील तरुण व अभ्यासू समाजभूषण प्रा शुभम प्रविण सावळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्तीचे अधिकृत पत्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री. मिलिंद दहिवाले यांच्या मान्यतेने नुकतेच जारी करण्यात आले. असून,
समाजातील ज्वलंत प्रश्नांना देणार वाचा
प्रा शुभम सावळे यांच्याकडे वृत्तपत्राच्या क्राईम रिपोर्टर पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या माध्यमातून ते:
समाजातील वाढते गुन्हेगारी प्रकार, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे,
मानवाधिकार उल्लंघन, महिलांवरील अत्याचार, हुंडा प्रथा आणि कौटुंबिक छळाच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती करणे,
बालमजुरी, कामगारांचे शोषण आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित मूलभूत समस्यांवर प्रकाश टाकणे,
नशामुक्ती, समाजप्रबोधन आणि जनहितार्थ शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे,
या सर्व सामाजिक व कायदेशीर मुद्द्यांवर वृत्तपत्राच्या माध्यमातून सखोल व परखड वार्तांकन करणार आहेत.
विविध क्षेत्रांतून कौतुक व शुभेच्छा
प्रा शुभम सावळे यांच्या नियुक्तीमुळे मलकापूर व बुलढाणा परिसरासह पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा वसा घेत समाजहितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार सावळे यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल ‘केंद्रीय मानवाधिकार’ (Central Human Rights) वृत्तपत्र समूह, स्थानिक पत्रकार बांधव, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवार व नातेवाईकांकडून त्यांचे भरभरून कौतुक होत असून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
