
प्रभू श्रीरामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेले तपोवन सीतामातेने स्नान केलेली ‘नहाणी’; तापेश्वर संस्थानला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व
वाशीम जिल्हा प्रतिनिधी,( अनिल जाधव)
ता. ३० : प्रभू श्रीरामचंद्राच्या वास्तव्याने तसेच ऋषिमुनी आणि तपस्वींच्या तपश्चर्येने पावन झालेली तपोभूमी म्हणून मालेगाव तालुक्यातील अमानी फाट्यापासुन पांगरी नवघरे गावाजवळील तपोवन परिसराची ओळख आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या या परिसराला श्रावण महिन्यात विशेष महत्त्व प्राप्त होते. सोमवती अमावस्या तसेच श्रावणातील सोमवारच्या दिवशी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.पुरातन काळात तपोवन परिसर हा दंडकारण्याचा भाग असल्याचे सांगितले जाते. या भागात अनेक ऋषिमुनींनी तपश्चर्या केली. ऋषींनी येथे तप केले म्हणून या परिसराला ‘तपोवन’ हे नाव पडल्याची आख्यायिका आहे. वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामचंद्र दंडकारण्यात आले असता त्यांनी या परिसरात वास्तव्य केल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. त्यामुळे या भूमीला धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.सीतामातेच्या ‘नहाणी’चीआख्यायिकातपोवन परिसरातील सर्वांत महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सीतामातेने स्नान केल्याचे मानले जाणारे स्नानगृह अर्थात ‘नहाणी’. या ठिकाणी सीतामातेने स्नान केल्याची आख्यायिका असल्याने भाविक या स्थळाचे श्रद्धेने दर्शन घेतात. पुरातन काळाच्या आठवणी जपणाऱ्या य श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा सोमवार आणि विशेषतः श्रावण महिन्यात तपोवन येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी श्री तापेश्वर संस्थान परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेत परिसरातील तसेच दूरवरून आलेले भाविक सहभागी होतात. सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री यांसारख्या धार्मिक पर्वांच्या काळातही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढते.ठिकाणाचे जतन आणि संवर्धन केल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते..तापेश्वर मंदिराची रचनातपोवन येथील श्री तापेश्वर संस्थानचे मंदिर पुरातन असून मंदिराचे गर्भगृह उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या गर्भगृहात श्री तापेश्वराचे शिवलिंग आहे. मंदिरासमोरील सभामंडपात शिववाहन नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या रचनेतून या स्थळाची प्राचीनता जाणवते.मंदिरालगत बाराही महिने पाणी असलेली विहीर आहे. स्थानिक भाषेत या विहिरीला ‘बाराव’ म्हणून संबोधले जाते. मंदिर परिसराला पूर्व आणि उत्तर दिशेला दरवाजे आहेत. मंदिराच्या ईशान्य दिशेला छोटी नदी अथवा नाला वाहत असून परिसराला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.रेणुकादेवी आणि शनि देवांचे स्थान तापेश्वर मंदिर परिसरात श्री रेणुकादेवीचे मंदिर असून ते उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या पश्चिम दिशेला श्री शनिदेवाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. त्यामुळे तपोवन परिसरात येणाऱ्या भाविकांना विविध धार्मिक वनविभागाच्या माध्यमातून मंदिरालगतचा परिसर निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे, ही समाधानाची बाब आहे. धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाला चालना मिळाल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासही मदत होईल :-(शिवभक्त तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल गं.जाधव अमानी) श्रावण महिन्यात शिवभक्तांसह परिसरातील भाविकांची येथे मोठी गर्दी असते. जीर्णोद्धार व पर्यटन विकासाची गरज श्री तापेश्वर संस्थानच्या भिंती व छताची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. मंदिराच्या प्राचीन वास्तूचे जतन करून त्याचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे. तसेच सीतामातेची ‘नहाणी’, तापेश्वर मंदिर, रेणुकादेवी मंदिर आणि परिसरातील नैसर्गिक ठिकाणे यांचा समावेश करून तपोवनचा एकात्मिक पर्यटन विकास केल्यास या परिसराला वेगळी ओळख मिळू शकते. माजी अमदार विजय जाधव यांच्या पुढाकाराने पांगरी नवघरे ते तपोवन येथे डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आला होता, त्या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, तसेच संस्थान जवळ माजी जि प सदस्या सौ उषा अनिल जाधव यांनी तिर्थक्षेत्र अंतर्गत टिनाचे (शेड)डोम दिले होते, रस्त्याचे सुरुवातीला मा जि प स गजानन गवळी यांनी स्वागत गेट(कमान) उपलब्ध करून दिले आहे , तपोवन येथे जिल्हातिल भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात, अनेक कावड मंडळ द्वारे श्रावण महिन्यात सोमवारी पाणी आणून शिवमंदिरात वाहतात, महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते
