संग्रामपूर तहसील कार्यालयातील सभागृह बांधकामावर ‘पारदर्शकते’ चा प्रश्न चौकशीची मागणी

संग्रामपूर तहसील कार्यालयातील सभागृह बांधकामावर ‘पारदर्शकते’चा प्रश्न; चौकशीची मागणी कामाचा बोर्ड नसल्याचा आरोप; ठेकेदाराऐवजी इतर व्यक्तींमार्फत काम सुरू असल्याची तक्रार

संग्रामपूर | प्रतिनिधी

संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या इमारतीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या सभागृहाच्या बांधकामाबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत तात्काळ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अॅड. जी. ए. क्षरिसागर, संग्रामपूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.तक्रार अर्जानुसार, सदर सभागृहाचे बांधकाम सुरू असताना कामाचा तपशील दर्शविणारा कामाचा बोर्ड अद्याप लावण्यात आलेला नाही. यापूर्वीही याबाबत तक्रार अर्ज देण्यात आला होता, मात्र अद्याप बोर्ड न लावण्याचे कारण काय, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे.तसेच, सदर बांधकामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारामार्फत प्रत्यक्ष काम न करता इतर व्यक्तींमार्फत बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. ही बाब नियमांनुसार आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, बांधकामाची वर्क ऑर्डर देऊन सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर बांधकाम सुरू करण्यामागील कारण काय, तसेच निर्धारित बांधकाम कालावधीबाबत विभागाने कोणती कार्यवाही केली, याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळावी, अशी मागणीही तक्रारदाराने केली आहे.दरम्यान, सदर बांधकामाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात यावी आणि तक्रारीतील सर्व मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी अॅड. जी. ए. क्षरिसागर यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव यांच्याकडे केली आहे.आता सार्वजनिक बांधकाम विभाग या तक्रारीची चौकशी करून नेमकी कोणती भूमिका घेतो, याकडे संग्रामपूरकरांचे लक्ष लागले आहे.बॉक्स➖👉🏿 सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार देऊन पाठपुरावा केल्यानंतर कामाचा बोर्ड लागला व त्यामुळे सदर काम 2024 असल्याचे उघडकीस आले … काम सुरु करण्यास दोन वर्ष लागलेला विलंब हा संशया स्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *