
*महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तत्परता
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट ते हिवरखेड राज्य महामार्गावर जमुना नदीच्या पुलाजवळ खंडाळा फाट्या नजिक वान धरणाच्या ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन वरील वाल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लिकेज लागून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत होती.हे पाहून जागरूक नागरिक पंकज इंगळे यांनी ही माहिती हिवरखेड विकास मंचचे संयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांना कळविली असता धिरज बजाज यांनी तात्काळ ही ब्रेकिंग न्यूज सोशल मिडिया वर टाकली तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून वेळ न गमावता तात्काळ मोठ्या प्रमाणात असलेले लिकेज दुरुस्तीसाठी कामगार पाठवून कार्य पूर्णत्वास नेले व गळती थांबवली आणि वाया जाणारे हजारो लिटर अनमोल पाणी वाचविले.त्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी टाकलेली ब्रेकिंग न्यूज प्रभावी ठरली.आणि पत्रकार व जागरूक नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हजारो लाखो लिटर पाण्याची बचत झाली आहे.
