
*अकोलखेड महसूल मंडळातील संत्रा पीकविम्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन विम्याचा लाभ देण्याची मागणी
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
तालुक्यातील अकोलखेड महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोर्डी येथील शेतकरी आक्रमक झाले असून अकोला जिल्हा दौऱ्या दरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खासदार अनुप धोत्रे,आ.प्रकाश भारसाखळे,आ.रणधीर सावरकर यांना निवेदन देण्यात आले आहे.अकोलखेड महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळताना हवामान केंद्राच्या नोंदी व निकषांमुळे अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला.वारंवार संत्रा पीक विमा मधून अकोलखेड सर्कल हे जाणीवपूर्वक वागण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.संत्रा उत्पादकांच्या अडचणींची दखल घेऊन पीकविम्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना संत्रा पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अकोलखेड मंडळातील शेतकरी,व बोर्डीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.
