
गणेशोत्सव उत्सव समितीतर्फे पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली.मिरवणूकी दरम्यान चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू न देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात सत्कार समारंभ घेण्यात आला.सर्वांच्या सहकार्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडली.अशाच प्रकारे शहरवासियांनी नेहमी सहकार्य करावे असे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पाटील,अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे,अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांचा समितीचे अध्यक्ष दिलीप बोचे,उपाध्यक्ष अचल बेलसरे व चेतन देवळे,सचिव जितेन बरेठीया, सहसचिव अक्षय घायल,सहकोषाध्यक्ष किरण साबळे,कोषाध्यक्ष प्रतिक झुनझुनवाला,सहसचिव मनिष उपासे,प्रसिध्दी प्रमुख मयुर नाठे,सदस्य योगेश वर्मा,पप्पु थोरात,सुमित बोरकुटे,मनिष बुंदेले,मार्गदर्शक अनंत मिसाळ यांनी सत्कार केला.
