माविमच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत अमरावती विभागाची राज्यात बाजीजिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मानमहिला बचत गटांच्या सबलीकरणातील उल्लेखनीय कामगिरीचा राज्यस्तरावर गौरव

माविमच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत अमरावती विभागाची राज्यात बाजीजिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मानमहिला बचत गटांच्या सबलीकरणातील उल्लेखनीय कामगिरीचा राज्यस्तरावर गौरव

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि. ७ ऑगस्ट (जिमाका): महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आयोजित राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविला, तर उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर वाशिम जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या या बैठकीत माविमच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.पुरस्कार वितरण समारंभात माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती राजलक्ष्मी शाह (भा.प्र.से.) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अशोक फाळणीकर, कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती रूपा मिस्त्री, व्यवस्थापक श्रीमती गौरी दोंदे, विभागीय सल्लागार केशव पवार तसेच विभागीय व्यवसाय सल्लागार पवन देशमुख उपस्थित होते.राज्यस्तरीय आढावा बैठकीत महिला बचत गटांचे सबलीकरण, आर्थिक समावेशन, रोजगारनिर्मिती तसेच माविमच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. या सर्व बाबींमध्ये अमरावती विभागासह वाशिम जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष दखल घेत कौतुक केले.या यशामुळे माविमचे अधिकारी, कर्मचारी, लोकसंचालित साधन केंद्रांचे प्रतिनिधी तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुरस्कार जिल्ह्यातील संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची राज्यस्तरीय पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकसंचालित साधन केंद्रांचे प्रतिनिधी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.ही माहिती जिल्हा समन्वय अधिकारी, माविम वाशिम, श्रीमती वर्षा खोब्रागडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *