
सावरगाव येथील महिलेवर माकडाचा हल्ला,महिला जखमी
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी अकोट
तालुक्यातील सावरगाव येथील रझीया बी रशीदिशा या महिलेला दिनांक २८/७/२०२६ रोजी राहत्या घरी माकळाने अचानक एकाएकी अंगावर झेप घेऊन गंभीर जखमी केले.जखमी अवस्थेत सदर महिलेला प्रथम ग्रामीण रुग्णालय आकोट येथे प्रथम उपचार करण्यात आले.नंतर जखमी महिलेला आकोला येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले.या महिलेची घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे.करिता जखमी महिलेला शासनाकडून शासकिय मदत देण्यात यावी.अशी मागणी तिच्या कुटुंबियाने केली आहे.
