राष्ट्रीय चर्मकार संघाच्या नवी मुंबई कार्याध्यक्षपदी विनोद पारखे यांची नियुक्ती

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या नवी मुंबई कार्याध्यक्षपदी विनोद पारखे यांची नियुक्ती

मुंबई | प्रतिनिधी सुधीर तायडे

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत संघाच्या नवी मुंबई कार्याध्यक्षपदी समाजसेवक विनोद पारखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे चर्मकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.ही नियुक्ती राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पालराज खरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच संघाच्या प्रदेश महिला अध्यक्ष शारदा ताई खरे यांनीही विनोद पारखे यांना शुभेच्छा देत समाजहिताच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला.विनोद पारखे हे अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, गरजू व वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवभक्त म्हणून धार्मिक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. गरीब, गरजू, युवक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने काम केले असून विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.तसेच रोजगारनिर्मिती, सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रबोधन आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. आतापर्यंत शेकडो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले असून समाजसेवेत त्यांचा ठसा उमटला आहे.नियुक्तीनंतर बोलताना विनोद पारखे म्हणाले, “राष्ट्रीय चर्मकार संघाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे.”त्यांच्या नियुक्तीचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार संघाचे नवी मुंबईतील कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *