
आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथे वन महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई
वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना +२ विभागाच्या वतीने ‘वन महोत्सवानिमित्त’ वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला महारोगी सेवा समिती, आनंदवनचे विश्वस्त श्री. सुधाकर कडू गुरुजी,

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे,उपप्राचार्य डॉ. गोपाल वरूटकर, माजी प्राध्यापक प्रा. आंबटकर,नीरज आत्राम ( राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ) महाविद्यालयातील सहकारी शिक्षकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
