
अमानी,सह परीसरातील शेतकऱ्यांनची पेरणीसाठी लगबग,
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,२९ :-तालुक्यातील २७ जूनला झालेल्या पावसामुळे २८ जून ला दुपारपासून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र अमानी सह परिसरात पाहण्यास मिळाली, जवळपास ४०/- टक्के आज रोजी पेरणी झाली असुन आज दि,२९ जून रोज सोमवार ला असलेल्या महिला, भगिनींचा वटपौर्णिमा हा उत्सव होता तरी महिला शेतकरी तसेच भगिनींनी शेतातल्या पेरणीला प्राधान्य देल्याचे दिसले, पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जवळपास पंधरा दिवसापासून पाणी नसल्याने अमानी परिसरात २७ जूनला, झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याने पेरणीला २८ जूनच्या दुपारपासून तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ट्रॅक्टर द्वारे पेरणी करण्यास सुरुवात केली, यावेळी नेहमीच पीक असणारे सोयाबीन सह हळद पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचं दिसतं, आजच्या वटपोर्णिमा सन साजरा करतांना पहिलं प्राधान्य शेतकऱ्यांने आपल्या शेतातपेरनीला,महत्व दिलं असल्याचे, तसेच धरतीआईची पुजा करून पाऊस चांगला होऊ दे पीक पाणी चांगले होऊ दे अस प्रतिपादन शेतकरी महिला उषा जाधव यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं
