राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अल्पसंख्याक विभाग) उत्तर बुलढाणा कार्यकर्ता मेळावा व बैठक जळगाव जामोद येथे उत्साहात संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अल्पसंख्याक विभाग) उत्तर बुलढाणा कार्यकर्ता मेळावा व बैठक जळगाव जामोद येथे उत्साहात संपन्न

जळगाव जामोद प्रतिनिधी

काल जळगाव जामोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने ‘अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळावा व बैठक’ मोठ्या उत्साहात पार पडली.या महत्त्वपूर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रसेनजितदादा पाटील हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा बुलढाणा जिल्हा निरीक्षक आदरणीय वाजेद आलम साहेब उपस्थित होते. या प्रसंगी प्रामुख्याने अड.रफिक शेठ, डॉ. रिजवान खान, अब्दुल रज्जाक साहेब, विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव, तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ आणि बाजार समितीचे संचालक महादेव भालतडक, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख तथा प्रसिद्धिप्रमुख आशिष वायझोडे,नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अड. करीम खान यांनी केले. त्यानंतर तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ, अब्दुल रज्जाक साहेब, डॉ. रिजवान खान आणि मुख्य मार्गदर्शक वाजेद आलम साहेब यांच्या नंतर जिल्हाअध्यक्ष प्रसेनजितदादा पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत पक्षाची ध्येयधोरणे आणि पुढील दिशा यावर सविस्तर मनोगत व्यक्त केले. या बैठकीला जळगाव जामोद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प या प्रसंगी करण्यात आला. अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष करीम खान यांनी यावेळी जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तथा विविध पदाच्या नियुक्तया यावेळी जाहिर केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *