जिल्हा कोषागार अधिकारी जवंजाळ यांची पदोन्नतीवर बदली

जिल्हा कोषागार अधिकारी जवंजाळ यांची पदोन्नतीवर बदली

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

येथील मुळ रहीवासी जिल्हा कोषागार अधिकारी वर्ग १ विजय अभिमान जवंजाळ यांची नुकतीच अमरावती येथे पदोन्नती वर बदली झाली असून त्यांना उपसंचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या पदावर अमरावती येथे बढती मिळाली आहे .
विजय जवंजाळ हे मालेगाव येथील रहिवासी असुन त्यांचे माध्यमिक शिक्षण नाथुराम नारायणदास मुंदडा विद्यालय मालेगांव येथे पुर्ण झाले . त्यांचे पदवी पर्यंत चे शिक्षण वाशिम ( बी.एससी ) येथे झाल्यानंतर त्यांनी बी. एड. ही पदवी प्राप्त केली . त्यानंतर त्यांनी एक वर्ष जिजामाता विद्यालय मालेगाव या ठिकाणी शिक्षक म्हणुन सेवा दिली .
त्यानंतर स्पर्धा परीक्षेत उतीर्ण होऊन ते महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात रुजू झाले होते . आरोग्य विभागात नोकरी करत असतानाच त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत परीक्षा दिली . कोणत्याही प्रकारचा शिकवणी वर्ग न लावता प्रचंड मेहनत घेऊन व घरीच अभ्यास करून त्यामधे पहील्याच प्रयत्नात ते उर्तीर्ण झाले . त्यानंतर त्यांची गोंदिया येथे उप मुख्य लेखा वित्त अधिकारी वर्ग १ म्हणून प्रथम नेमणूक झाली. त्यानंतर तेथेच ते जिल्हा कोषागार अधिकारी या पदावर रुजू झाले . नंतर अकोला येथे सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा अकोला या ठिकाणी ते जॉईन झाले. त्यानंतर 2023 मध्ये वाशीम या ठिकाणी जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून रुजू झाले. तेव्हापासून ते 19 जून 2026 पर्यंत त्याच पदावर होते.
आता त्यांची अमरावती येथे उपसंचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे. वाशीम जिल्ह्यात त्यांचा तीन वर्षाचा सेवा काळ अत्यंत चांगला राहीला . अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व मराठी माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या विजय जवंजाळ यांनी आपल्या अथक परिश्रमाने चिकाटीने क्लास वन पदापर्यंत मजल मारली असल्याने मालेगांव करांसाठी ती आभिमानाची बाब ठरली आहे . सर्वसामान्य माणसात मिसळून व सर्वांना सोबत घेऊन कोणतीही लालसा न ठेवता अतिशय पारदर्शक पणे त्यांनी त्यांची सेवा दिली . त्यांचे जागेवर कोणता अधिकारी रुजू होणार हे मात्र निश्चित समजू शकले नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *