
आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्यासाठी नियोजन बैठकमुक्ताबाई संस्थान व प्रशासनात संवाद
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीच प्रस्थान दि.२४ जून रोजी होऊ घातले आहे.त्या अनुषंगाने महसूल कार्यालयात प्रथम नियोजन बैठक आज दि.१९ जून रोजी पार पडली.त्यात मुक्ताबाई संस्थान व प्रशासनात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व संवाद घडून आला. उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या नियोजन बैठकीत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील,पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी पालखीचे आगमन, मुक्काम व प्रस्थान या तिन्ही प्रक्रियेत वारकऱ्यांना आवश्यक सुविधा मिळत करून देण्याबाबत विचारमंथन व नियोजन करण्यात आले. यावेळी डिवायएसपी आनंद महाजन,न.प.मुख्याधीकारी संजय केदार,गटविकास अधिकारी वेदीका सजगाणे, पोलिस निरीक्षक गणेश गिरी, ग्रामीण पोलीस निरीक्षक सतिश महल्ले, एमआयडीसी पोलिस निरीक्षक दिपक वारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा जैन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन भोळे, सरपंच ज्ञानदेव ढगे आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हभप नितीन महाराज अहिर यांनी केले………….पालखीसाठी आवश्यक सुविधावर चर्चा @पिण्याचे पाणी @स्वच्छतागृह@विजपुरवठा @मार्गक्रमणातील अडथळे @आवशक्य ठिकाणी वॉटरप्रुफ मंडप@घोडे-बैलांसाठी चारापाणी……….पालखी सोहळ्यासाठी आपात्कालीन पथक…आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याच नियोजन सुव्यवस्थीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपत्कालीन पथक गठीत करण्यात आले आहे.त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्य करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधीकाऱ्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद….आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ प्रविण देवरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजन समितीचे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.त्या़ंनी मुक्ताबाई संस्थानच्या वतीने सूचना ऐकून घेतल्या.त्याच अनुषंगाने पालखी सोहळा दिमाखदार करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
