रिसोड- मालेगाव विधानसभा शिवसेना B L A प्रशिक्षण व मार्गदर्शन

रिसोड- मालेगाव विधानसभा शिवसेना B L A प्रशिक्षण व मार्गदर्शन सहा जुन ला शिरपूर येथे उपस्थित राहावे-प्रदिप कुटे

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव),

दि ३ जुन :-शिवसेना मुख्यनेते, राज्यचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार युवकांचे नेते खा.श्रीकांतजी शिंदे, शिवसेना नेत्या आ. भावनाताई गवळी , अकोला लोकसभा संपर्कप्रमुख मा आ डॉ.राजनजी सावळी यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बुथनिहाय नेमलेल्या बी एल ए यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन माजी निवडणूक अधिकारी माननीय अविनाश सणस साहेब एस आय आर मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी BLA म्हणून नेमणूक असलेले सर्वांनी प्रशिक्षणाला वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान प्रदीप कुटे मालेगाव तालुका शिवसेना प्रमुख यांनी केले आहे, आज मालेगाव येथील रेस्ट हाऊस येथे मालेगाव नगरपंचायत चे नगरअध्यक्ष, ओम खुरसुडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून

जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे प्रमुख उपस्थिती शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप कुटे यांची उपस्थिती लाभली होती या प्रसंगी प्रास्ताविक प्रदीप कुटे यांनी केले तर मार्गदर्शन महादेवराव ठाकरे यांनी केले सहा जूनला शिरपूर येथे राधाकृष्ण लॉन्स वर असलेल्या प्रशिक्षणा संदर्भात शिवसेनेच्या कार्याबद्दल अधिक माहिती देऊन या कार्यक्रमाला बी एल ए जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवा असे याप्रसंगी सांगितले, कार्यक्रमाला, ओबीसी उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी, तालुकाप्रमुख माणिकराव गालट, गजानन गरड ,अनिल जाधव, मोहन लहाने, संजय घुगरे, सुधाकर धोंगडे, केशव कालापाड, ऋषिकेश सारसकर, गजानन धनगर, संतोष पांढरे सुधाकर टाले, विठ्ठल पवार, संतोष गवळी, भाऊराव कुटे, विलास वानखेडे यांच्यासह शिवसैनिक तसेच नगरसेवक यांची उपस्थिती लाभली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *