
मोफत पाणी सेवा” नगरपंचायतीची भूमिका; उप-मुख्याधिकारी अद्याप टँकर सुरूच नाहीत,तर नगराध्यक्ष ‘आतापर्यंत सर्व सेवा मोफतच’*वर्तमान पत्रातील बातमी चार असलं
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव )
मोफत पाणी सेवा” वर्तमान पत्रातील चर्चेने राजकीय व सामाजिक वातावरण तापले प्रशासनाची भूमिका स्पष्ट, नगराध्यक्ष यांची ही प्रतिक्रिया शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असताना काही प्रभागांमध्ये सुरू असलेल्या “मोफत पाणी टँकर सेवा” मुळे आता शहरात नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर मोठमोठे बॅनर,फोटो आणि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर “ही सेवा खरोखर वैयक्तिक खर्चातून आहे का?” तसेच “उद्या या टँकरचे बिल नगरपंचायतीच्या बोकांडी बसवले तर जबाबदार कोण?” असा सवाल नागरिकां कडूनही उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, “मोफत पाणी सेवा” या नावाखाली अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुरू असल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असले तरी अनेकांनी पारदर्शकते बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत दरम्यान,मालेगाव नगरपंचायतीचे उप-मुख्याधिकारी इमरान शेख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, “अद्याप नगरपंचायती कडून अधिकृत पाणी टँकर सेवा सुरू करण्यात आलेली नाही. पुढील दोन-चार दिवसांत नगरपंचायतीची टँकर सेवा सुरू होणार आहे.” त्यांच्या या प्रतिक्रिये मुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या “मोफत पाणी सेवा” उपक्रमाबाबत नवी चर्चा रंगू लागली आहे. माहितीनुसार,काही प्रभागांमध्ये “मोफत पाणी टँकर सेवा” ही ४ मे २०२६ पासून सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता या सेवेसाठी वापरले जाणारे पाणी,खर्च,टँकर व्यवस्था आणि भविष्यातील

देयकांबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये महिलांना अजूनही भर उन्हात पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत, तर दुसरीकडे पाण्याच्या टँकर वर मोठमोठे फोटो आणि बॅनर झळकत असल्याने “सेवा की प्रसिद्धी?” असा सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत. नगराध्यक्षांच्या या प्रतिक्रिये नंतर समर्थकांकडून त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले जात असले तरी नागरिक आता पुढील काळात या पाणीपुरवठ्याची अधिकृत नोंद, खर्च आणि नगरपंचायतीची भूमिका काय राहणार याकडे लक्ष ठेवून आहेत. “खरोखर सेवा असेल तर पारदर्शकता देखील असली पाहिजे,” अशी भावना आता शहरात जोर धरू लागली आहे.चौकट… ११ मे पर्यंत मोफतच… नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांची प्रतिक्रियादि.११-५-२०२६ पर्यंत कोणतेही देयक अदा होणार नाहीत आतापर्यंत आम्ही मोफतच पाणी वाटले, इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात देखील नळ सुरू आहेत पंधरा दिवसांनी का होईना,थोडा फार आधार जनतेला होत आहे. जवळपास सर्वच प्रभागात बोअरवेल व पाईप लाईनची कामे सुरू आहेत त्याचाही फायदा नागरिकांना होत आहे. ओमप्रकाश खुरसडे,नगराध्यक्ष , नगरपंचायत, मालेगाव.
