
१कोटी,३१ लाख,५१ हजार २५० रूपये चा मुद्दे माल जप्त, महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने कार्यवाही
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि ९ मे रोजी रात्री ९ वाजता दरम्यान समृद्धी महामार्ग, कारंजा लाड टोल नाका येथे महामार्ग पोलिस विभागातील PSI कृष्ण कन्हैया पवार व पोलीस अंमलदार यांच्याकडून वाहन तपासणी चालू असताना, मा. पोलीस अधीक्षक साहेब, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या माहिती प्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आयशर क्रमांक MH40CT2964 हा मिळून आला. त्यामध्ये गोडसर वास येत असल्याने PSI कृष्ण कन्हैया पवार यांनी सदर वाहन चालकाला वाहनांमध्ये काय असल्याबाबत विचारणा केली असता, वाहन चालकाने वाहनामध्ये तंबाखू सदृश्य पदार्थ, अमरावती येथील जावेद नामक व्यक्तीचे रअसल्याचे सांगितले. त्यावरून psi कृष्ण कन्हैया पवार यांनी सदर बाबत माहिती लगेच महामार्ग पोलीस विभाग, वाशिम चे प्रभारी अधिकारी API नितीन दांदडे यांना दिली. API नितीन दांदडे यांनी महामार्ग पोलीस विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांना माहिती देऊन पोलीस अधीक्षक महामार्ग विभाग नागपूर परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली सदर गाडी ताब्यात

घेऊन पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे डिटेन करून, महामार्ग विभागाच्या निगराणीत ठेवली. API नितीन दांदडे यांनी लगेच फोन द्वारे अन्न व औषध प्रशासन विभाग यांना माहिती दिली. तसेच सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, वाशिम यांना सदर मालाची तपासणी करून त्यांचा अभिप्राय मिळविण्याकरिता पाचारण करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी सदर मालाची तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये असलेला माल प्रतिबंधित गुटखा / सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाल्याने psi कृष्ण कन्हैया पवार यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई मध्ये एकूण1,31,51,250 रु इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस स्टेशन कारंजा शहर करत आहे. सदर कारवाई महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूर परीक्षेत्र, नागपूर चे पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात महामार्ग पोलीस विभाग, वाशिम चे प्रभारी अधिकारी API नितीन कुमार दांदडे, psi कृष्णकन्हैया पवार, प्रकाश सरनाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल इंगोले अजय दाभाडे व पोलीस कॉन्स्टेबल आनंद काकडे.संतोष ठाकरे. रमेश इंगोले. विनोद राऊत. गंगाधर अडाणी. गणेश गावंडे.मधुकर देसाई. यांनी पार पडली.
