नवीन पोलीस अधीक्षकांची शिरपूर पोलीस स्टेशनला अचानक भेट

नवीन पोलीस अधीक्षकांची शिरपूर पोलीस स्टेशनला अचानक भेट

वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)

वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची नुकतीच पुणे येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी मागील दोन दिवसांपूर्वी रुजू झालेले नवीन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी लगेच जिल्ह्यातील पोलिस स्टेशन ला अचानक भेटी देणे सुरू केले आहेत. त्यांनी ९ मे रोजी शिरपूर पोलीस स्टेशनला पूर्वसूचना न देता भेट दिली.नुकतीच पोलीस अधीक्षक पुणे येथून आलेले निकेश खाटमोडे यांची वर्णी लागली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक खाटमोडे यांनी

जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला अश्या भेटी देणे सुरू केल्या आहेत. त्यानुसार त्यांनी ९ मे रोजी शिरपूर पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. कार्यभार सांभाळताच इतिहासात पहिल्या दोन दिवसातच शिरपूर पोलीस स्टेशनला व्हिजिट देणारे पहिले पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे ठरले आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या अश्या भेटी मुळे त्यांची कार्यशैली उजागर होत असून त्यांच्या काळात कायदा व सुरक्षा अबाधित राहील अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे. यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनचे पी आय केशव वाघ, पी एस आय तायडे,पी एस आय चव्हाण,पी एस आय इरफान पठाण व बहुतांश पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *