
मनक्या पेरेन लागा’ ही १० वीच्या कुमारभारती मध्ये कवी वीरा राठोड यांची बंजारा भाषेतील मूळ कविता
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मनक्या पेरेन लागा’ ही इयत्ता १०वीच्या मराठी (कुमारभारती) पाठ्यपुस्तकातील कवी वीरा राठोड यांची बंजारा भाषेतील मूळ कविता समाविष्ट करण्यात आली आहे, जिचे विनायक पवार यांनी ‘माणसं पेरायला लागू’ या नावाने भाषांतर केले आहे. या कवितेचा सारांश आणि भावार्थ खालीलप्रमाणे आहे:कवितेचा मुख्य आशय (माणसं पेरायला लागू): माणुसकीची पेरणी: कवी समाजाला निसर्गाचे उदाहरण देऊन सांगत आहेत की, ज्याप्रमाणे शेतकरी जमिनीत बी पेरतो आणि त्यातून धान्य उगवते, त्याचप्रमाणे समाजात ‘माणसं’ पेरायला हवीत.

संस्कारांचे महत्त्व: माती जशी बीजाचे संरक्षण करते आणि त्याला वृक्षात रूपांतरित करते, तसे आपण माणुसकीचे संस्कार रुजवून समाजाला सांधले पाहिजे.काळाची गरज: आजच्या काळात माणुसकी पेरणे अत्यंत गरजेचे आहे. माणुसकी पेरणे म्हणजे समाजावर चांगले संस्कार करणे, एकमेकांना मदत करणे आणि मायेचे नाते निर्माण करणे.कवितेचे वैशिष्ट्य: ही कविता बी आणि माती यांच्यातील नात्यातून मानवी जीवनाचे मर्म सांगते. “माणसं पेरा, माणुसकी उगवेल” हा या कवितेचा [गाभा] आहे. या कवितेपासून माणुसकीचे धडे घ्यावे व प्रत्यक्ष भावार्थ आचरणात आणावे ही नम्र विनंती श्रावण जाधव प्रबोधनकार मालेगांव यांनी केली आहे.
