शेतकऱ्यासह शालेय विद्यार्थ्यांना अडचण,सेवा पोर्टल चालू करा जाधव यांची मागणी

सेवा दिनीच, आपले सरकार सेवा पोर्टल बंद ?शेतकऱ्यासह शालेय विद्यार्थ्यांना अडचण,सेवा पोर्टल चालू करा जाधव यांची मागणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

राज्यात दरवर्षी २८ एप्रिल रोजी सेवा दिन साजरा केला जातो. या वर्षाचा सेवादिन यंदा नागरिकांसाठी त्रासदायक ठरल्याचे चित्र समोर आले आहे. सेवा दिनाच्या दिवशीच आपले सरकार सेवा पोर्टल दिवसभर बंद असल्याने अनेक ऑनलाइन सेवा ठप्प झाल्या होत्या. महसूल, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, तसेच विविध शासकीय अर्ज भरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आपले सरकार सेवा पोर्टलचा वापर करतात. मात्र, पोर्टल अचानक बंद असल्याने नागरिकांना आवश्यक कामे वेळेत पूर्ण करता आली नाहीत. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोठा फटका बसला. अधिकाऱ्यांच्या मते, सेवा दिना निमित्त तांत्रिक

देखभाल आणि प्रणाली अद्ययावत करण्याचे काम करण्यात आले. परंतु, याबाबत आधीच स्पष्ट सूचना देणे आवश्यक होती. सुचना न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पोर्टलचे कामकाज पूर्णपणे बंद करण्याऐवजी टप्याटप्याने देखभाल करायला हवी होती. तसेच, सेवा बंद राहणार असल्यास पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. २८ एप्रिल हा संपूर्ण महाराष्ट्रात सेतू केंद्रावर सेवा दिन म्हणून मोठ्या थाटात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला ‌, परंतु 28 एप्रिल पासून आज रोजी पर्यंत तीन चार दिवस होऊन गेले अद्यापही पोर्टल सेवा सुरू झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना, शेतकऱ्यांना,कागदपत्राची कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत असताना दिसत आहे, बंद असलेली ही पोर्टल सेवा तात्काळ सुरू करावी, आणि नागरिकांची अडचण दूर करावी, आजच बारावीचा निकाल जाहीर झाला असुन विद्यार्थ्यांनी सेतू मार्फत कागदपत्रे काढण्यासाठी अडचण येवुनये, करिता पोर्टल सेवा सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *