
मेडशी येथे ‘शहा बाबू फर्निचर’ला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
तालुक्यातील मेडशी येथील ‘शहा बाबू फर्निचर’ सकाळी चार ते पाच दरम्यान पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान सागवान लाकूड, नवीन तयार फर्निचर कामाच्या मशिनरीज. इतर साहित्य व काही महत्त्वाचे कागदपत्रे, जळून खाक झाले. आगीत संपूर्ण व्यावसायिक संकुल राखेच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवार दि. २५ एप्रिल रोजी पहाटे 4ते 5 च्या सुमारास दुकानाच्या एका भागातून धूर निघताना काही नागरिकांना दिसला. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानात मोठ्या प्रमाणावर सागवान लाकूड, पॉलिशचे साहित्य आणि लाकडी सामान असल्याने आगीचा भडका उडाला. पहाटे ४ ते ६ या दोन तासांच्या काळात आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसराला वेढले होते. आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मेडशी परिसरातील हजारो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्या साठी प्रयत्न केला.दरम्यान, मालेगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिक व जे सी बी च्या मदतीने अथक परिश्रम घेत काही तासात आगीवर नियंत्रण मिळवले. ‘शहा बाबू फर्निचर’ हे परिसरातील एक मोठे प्रतिष्ठान आहे. या आगीत दुकानातील उच्च दर्जाचे सागवान लाकूड पूर्णतः जळून खाक झाले.तयार सोफा सेट, कपाटे आणि शो-केसचा कोळसा झाला.अत्याधुनिक मशिनरी आणि कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्टआहे.आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.मेडशीच्या व्यापारी इतिहासातील ही एक मोठी दुर्घटना मानली जात आहे.
