ग्राम रोजगार सहायक! १८ महिने मानधन नाही१ मे रोजी वाशिममध्ये उपोषणाचा इशारा

ग्राम रोजगार सहायक! १८ महिने मानधन नाही;१ मे रोजी वाशिममध्ये उपोषणाचा इशारा

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शासकीय योजनांचा ग्रामीण स्तरावर अंमलबजावणी करणारा मुख्य घटक म्हणजेच ‘ग्राम रोजगार सहायक’ सध्या प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. गेल्या १८-१९ महिन्यांपासून हक्काचे मानधन न मिळाल्याने आणि कामाच्या जाचक अटी लादल्या गेल्याने, वाशिम जिल्ह्यातील समस्त ग्राम रोजगार सहायकांनी आता आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. येत्या १ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.काय आहेत मुख्य तक्रारी आणि मागण्या?महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ८ हजार रुपये मानधन आणि २ हजार रुपये भत्ता देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, आज १८ महिने उलटूनही एका पैशाचेही वाटप झाले नाही. “काम करूनही पदरी निराशा” अशी अवस्था सहायकांची झाली आहेशासन निर्णयानुसार हे पद ‘अर्धवेळ’ स्वरूपाचे आहे. मात्र, २५ मार्च २०२६ च्या नवीन आदेशानुसार एन.एम.एस. (NMS) द्वारे दिवसातून दोनदा ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा ओळखून हजेरी) सक्तीचे केले आहे. दोन वेळा हजेरी लावणे म्हणजे पूर्ण वेळ कामावर राहणे, मग मानधन अर्धवेळ का? असा सवाल उपस्थित होत आहे. एका सहायकाकडे ८० ते ९० घरकुले, १० ते १५ फळबागा, २० ते २५ सिंचन विहिरी, गोठे आणि जलतारा अशी अनेक कामे असतात. या सर्व कामांच्या ठिकाणी जाऊन दिवसातून दोनदा ऑनलाईन हजेरी घेणे म्हणजे पूर्ण दिवसही अपुरा पडतो. ३० मार्च २०२६ पासून जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहायकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकारी यांना रीतसर निवेदने देण्यात आली आहेत.*प्रतिक्रिया*”ग्राम स्तरावर शेतकरी आणि शासन यांच्यातील आम्ही महत्त्वाचा दुवा आहोत. शासन आमच्याकडून सर्व कामे करून घेते, पण मानधन न देता आम्हाला उपाशी ठेवत आहे. हे धोरण आता आम्ही खपवून घेणार नाही.”*—सुभाष तायडे (ग्राम रोजगार सहायक,मेडशी)**”या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो ग्राम रोजगार सहायक सहभागी होणार असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.”* *-(ग्राम रोजगार सहाय्यक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य वाशीम)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *