उष्णतेचा वाढता कहर दुपारी घराबाहेर पडणे टाळा वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास वाहुळे

उष्णतेचा वाढता कहर : दुपारी घराबाहेर पडणे टाळा! — वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास वाहुळे

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

सध्या तालुक्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे वाढत्या उष्णतेमुळे डोकेदुखी,चक्कर येणे,थकवा,ताप येणे,रक्तदाब वाढणे,अस्वस्थता,त्वचा कोरडी पडणे तसेच बेशुद्धावस्था यांसारख्या त्रासांमध्ये वाढ होत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय मालेगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास वाहुळे यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे उन्हाचा तीव्र परिणाम टाळण्यासाठी दुपारी १ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले डॉ. वाहुळे पुढे म्हणाले की, उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, ताक, लिंबूपाणी, फळांचा रस यांचे सेवन करणे, हलके व सैल कपडे वापरणे तसेच डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा विशेषतः लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,गर्भवती महिला तसेच शेतकरी व मजूर यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क टाळावा,गरज असल्यास सावलीत थांबावे आणि उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय प्रशासन सज्ज असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास वाहुळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *