अकोला लोकसभा संपर्कप्रमुख च्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आढावा बैठक संपन्न

अकोला लोकसभा संपर्कप्रमुख च्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आढावा बैठक संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. शिवसेना नेत्यां आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने मालेगाव तालुका शिवसेना आढावा बैठक दि १३ एप्रिल सोमवार रोजीनगर पंचायत सभागृह मालेगाव येथे पार पडली यावेळी प्रमुख मार्गदर्शक अकोला लोकसभा संपर्कप्रमुख मा आमदार डॉ राजनजी साळवी साहेब युवा नेत्या संजनाताई गवळी वाशीम जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे ज्येष्ठ नेते मुकुंदराव मेडशीकर काका. महिला जिल्हाप्रमुख वैशालीताई येळणे मालेगाव तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे नगराध्यक्ष ओम भाऊ खुरसडे उपाध्यक्ष संजय भुतेकर युवासेना जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील मोरे मारवाडीसेना जिल्हाप्रमुख संजय सोमानी वाहतूक सेना जिल्हाप्रमुख नामदेवराव भांदुर्गे. सर्व सेलचे तालुकाप्रमुख. युवा उदयोजक अभिषेक मुंदडा. हरीश काबरा शहर प्रमुख संतोष बळी सन्माननीय सर्व सभापती नगरपंचायत. सन्माननीय सर्व नगरसेवक. तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व उपतालुकाप्रमुख सर्कल प्रमुख उपसरकल प्रमुख शिवसेना युवासेंना विविध सेलचे शिवसेना कार्यकर्ते शिवसैनिक. यावेळी हजर होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली तदनंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुकुंदराव मेडसीकर काका यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा डॉ साळवी साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे यांनी केले त्यानी तालुक्यातील संपूर्ण माहिती सांगितली नंतर प्रदीप पाटील मोरे यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीची जाणीव करून दिली. महादेवराव ठाकरे यांनी आपल्या भाषणात संपूर्ण मतदारसंघातील स्थितीची माहिती दिली. मुकुंदराव मेडशीकर अकोला जिल्हा परिषद चे मा जि प अध्यक्ष यांनी मालेगाव तालुका शिवसेनामय झाल्याचे सांगितले.नंतर मुख्य मार्गदर्शन डॉ राजन साळवी साहेब यांनी केले आपल्या भाषणात राज्यातील चालू घडामोडी पक्ष ध्येय धोरण.पक्ष संघटन. शिस्त. यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सचिव राजू पाटील कव्हर यांनी केले कार्यक्रमालाविलास जाधव, विवेक गवळी, अनिल जाधव, गजानन केंद्रे , सेवाराम चव्हाण, भास्कर गुडदे यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिकांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *