
सुनगाव येथे ‘समाधान शिबिरात १३३२ लाभार्थ्यांना मिळाला थेट लाभ
जळगांव जामोद (प्रतिनिधी)
जळगाव जामोद मतदारसंघाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि युवकांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळवून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. येत्या ४ वर्षांत या भागात ४ ते ५ मोठे उद्योग सुरू करण्यात येतील, तसेच शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी लवकरच भव्य ‘कोल्ड स्टोरेज’ उभे राहणार आहे,” अशी ग्वाही आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिली.आज दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर’ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार डॉ. संजय कुटे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात अतिशय दणक्यात झाली. ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव येथून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली भवानी चौक, सरकारी दवाखाना मार्गे जिल्हा परिषद शाळेत पोहोचली. वाटेत प्रतीक चौकात जिल्हाधिकारी, आमदार महोदय आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. शाळेत पोहोचल्यानंतर मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून शिबिराचा शुभारंभ झाला.प्रशासकीय यंत्रणा मंचावरयावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार पवन पाटील, रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी,श्रीकांत जोशी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय गोसावी, माजी सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.या शिबिरात विविध विभागांनी स्टॉल्स लावून नागरिकांना जागीच सेवा दिली. दिवसभरात एकूण १३३२ लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा व इतर योजनांचा आढावा घेण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या लोकाभिमुख कामांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या शिक्षिका घोटेकर यांनी केले तर आभार महसूल अधिकारी गौतम वाघ यांनी केले.आधार अपडेट (१७), नैसर्गिक आपत्ती ई-केवायसी (०७) आणि ग्रामपंचायतीच्या ३७ सेवांचा लाभही नागरिकांनी घेतला. “शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, हाच या शिबिराचा मूळ उद्देश असल्याचे” त्यांनी नमूद केले.या शिबिरामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशांची मोठी बचत झाली असून, एकाच छताखाली सर्व दाखले मिळाल्याने सुनगाववासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी शिंदे, कृषी मित्र मोहनसिंह राजपूत, कोतवाल सचिन कपले, तुकाराम ढोले, ग्रामपंचायत कर्मचारी तथा गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
