आधार कार्ड जमा करणे अनिवार्यवेळेत कागदपत्रे सादर करा तहसीलदार दीपक पुंडे यांचे आवाहन

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युडीआयडी व आधार कार्ड जमा करणे अनिवार्यवेळेत कागदपत्रे सादर करा तहसीलदार दीपक पुंडे यांचे आवाहन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव:)

सामाजिक न्याय वविशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (UDID) काढून घेऊन ते आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक करण्यात आले आहे. संबंधित कागदपत्रे वेळेत ग्राम महसूल अधिकारी किंवा महसूल सेवकाकडे जमा करावीत, असे आवाहन मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी केले आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड योजनांशी तीन महिन्यांच्या आत संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, १५ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य १५०० रुपयांवरून वाढवून २५०० रुपये करण्यात आले आहे. हे अर्थसहाय्य डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जात आहे. दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभांचा लाभ मिळण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आधार कार्ड अद्ययावत करून २५ मार्चपूर्वी संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा महसूल सेवकाकडे जमा करावे, असे तहसीलदार पुंडे यांनी स्पष्ट केले आहे. निर्धारित मुदतीत कागदपत्रे जमा न केल्यास पात्र लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी मालेगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे वेळेत जमा करावीत, असे आवाहन मालेगाव तहसीलदार दीपक पुंडे यांनी केले आहे.

..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *