
बालविकास शाळेत महिला सुरक्षाविषयक जन जागृती
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,७ बालविकास मंदिर प्राथमिक शाळेत ‘जागर नारीशक्ती जनजागृती उपक्रमांतर्गत कायदे तज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . “आरोग्य हिच खरी संपत्ती” या संकल्पनेला अनुसरून श्री व्यंकटेश सेवा समिती, वाशिम द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा, मालेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबिर तसेच स्त्री शिक्षण व महिला सुरक्षा कायदे विषयकय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संचालिका सविता जाधव, उद्घाटन न.प शिक्षण व आरोग्य सभापती सविता सारडा यांनी केले.यावेळी ॲड.यास्मिन रेघीवाले. तसेच प्रमुख आरोग्य मार्गदर्शक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सौ. रेणुका कापूरे, डॉ.ममता मानधणे, डॉ.मनिषा देवळे आणि डॉ.भाग्यश्री पोफळे तसेच स्त्री शिक्षण या विषयावर प्रा. गुलाबराव साबळे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मालेगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगरसेविक प्रियंका अभि घुगे, इंदिरा कैलास गुजरे, रज्जु गजानन काळे, सलीमा बी. शेख हरूण (सभापती, महिला व बालकल्याण, न.प.) , वनमाला प्रेमानंद डाखोरे, शहा मरियम बी. सबीर शहा, राधा दयाराम गायकवाड व ज्योती सखाराम सोभागे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे यांनी केले. प्रा.गुलाबराव साबळे यांनी स्त्रियांचा प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीचा सहभाग असतो व स्त्री शिक्षण आज का गरजेचे आहे असे स्त्री शिक्षण विषयक मार्गदर्शन केले. ॲड यास्मिन रेघीवाले यांनी महिलांना त्यांच्या सुरक्षा कायदा विषयक मार्गदर्शन केले. डॉ.रेणुका कापूरे, ममता मानधने, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सविता जाधव यांनी महिला सशक्तिकरण व आधुनिक जनजागृती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिलकुमार सरकटे यांनी केले.
