मालेगाव तलावातून पाणी उपसा बंद करण्यासाठी मत्स्य संस्थेचे निवेदन

मालेगाव तलावातून पाणी उपसा बंद करण्यासाठी मत्स्य संस्थेचे निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव)

ता.५मालेगाव ( केळी) तलावातून अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने अध्यक्ष शहा फकिर यांनी लघु पाटबंधारे विभाग यांना ता.४ रोजी लेखी निवेदन देऊन अवैध पाणी उपसा बंद करण्याची मागणी केली आहे.शहा यांनी निवेदनात नमूद केले की, मालेगाव,केळी भेरा,अमानी, आणि शिरपूर येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके घेतली, मात्र पीके घेताना ३ एच.पी.ची परवानगी असताना पाच ते सात हार्स पावरचे पंप वापरले व अनेकांनी तर वीज तारांवर हूक टाकून चोरीची वीज वापरून वारेमाप पाणी उपसा केला.त्यामुळे शंभर टक्के भरलेल्या तलावात सध्या मृत जलसाठा उरला आहे.जर लवकरात लवकर हा अवैध पाणी उपसा केला नाही तर, जनावरांना पिण्यासाठी पाणी राहणार नाही.तसेच गाडगे बाबा नगर, मुंगसाजी नगर जामा मश्जित परिसर व अकोला फाटा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
तेव्हा तातडीने अवैध पाणी उपसा बंद करा अशी मागणी शहा फकिर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने अध्यक्ष यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *